गाय आणि यान
गाय आणि यान
1 min
178
अंतराळात या
दिसे एक यान
उभे पृथ्वीवर
घेण्यास गऊस
पूज्य माता गऊ
हंबरडा फोडी
पिल्यास माझ्या या
कशासाठी सोडी
महत्त्व न कळे
मानवास आज
माय आणि गाय
दोघीही समान
अंतराळवीर
नेतील गाईस
पश्चातापाने हो
लागेल मनास
माफ कर माते
इथे मानवास
सेवा तुझी कुठे
कमी पडे आज
परग्रहावर
होईल स्वागत
महत्त्व जाणून
जोडतील हात
