गावातल्या कॉलेज मध्ये सुरू ...
गावातल्या कॉलेज मध्ये सुरू ...
गावातल्या कॉलेज मध्ये सुरू झाला
दोघांच्या प्रेमाचा लपंडाव......!
रोज रोज होऊ लागल्या भेटी भाव
नदी काठी कोण बसली होती
समजलं नाहीं रावं......!
सगळ्या गोष्टी गुफ्टगू होत्या भाव
रात्री सगळी झोपली की बाहेर भेटायला
जातं होती रावं......!
मनातल्या मनात विचार चालले होतें भाव
कुणाला कुठे चालली की सांगत होती
वेगवेगळी बहाणे रावं घरची सुन्न झाली रावं......
एक दिवस मैत्रिणीला विचारलं भाव
ती काहींच नाहीं बोलली भाव तिचं
सुध्दा सूत जुळलं त्याच्या सोबत रावं
विचारावं कुणाला तेच कळतं नाहीं भाव.....!
किती पत्ते पिसले भाव
आपला पत्ता झाकून ठेवतो रावं
गुरूजीचं लपड मास्तरीनबाई सोबत
पकडलं भाव......
आजची पिढी याचा आदर्श घेणार भाव
स्वतःच्या पायावर उभा रहा सांगत्यात रावं
याचं पाच वर्षे पूर्ण झाली तोच अभ्यासक्रम
सुरु आहे भाव......!
गावच्या पाटलांची पोर आहे भाव
मैत्रिणीचं गुरुजींच्या पोरासोबत
प्रेमाची बाराखडीचे धडे गिरवते रावं
पाटलाला हें बघून धक्काच बसला भाव
सगळ्यांना सांगत होता माझी अशी नाय पोरं
कधीना कधीं सापडतो चोर.
