STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

गावाकडली जत्रा

गावाकडली जत्रा

1 min
541

जाऊ गावाकडे एकदा

पाहू गावाकडली जत्रा

हौशे गवशे नवशे येती

गावामध्ये भानगडी सत्रा


गाव येरळेच्याच तीरावर

नाथबाबांचे आहे देऊळ

त्याला हे मोठे प्रवेशद्वार

वाटतंय जणू एक राऊळ


मुंबई-पुण्याचे चाकरमानी

जमती या गावच्या जत्रंला

लागतात नाना दुकानं तिथं

सजुन येती लेकीही यात्रंला


कुस्त्या तमाशाचे लागे फड

छंदीफंदी जमतात गावगुंड

बक्षिसांची होतीया खैरात 

आजूबाजूच्या पोरांची झुंड


पालखी फिरता गावातूनी

गुलालखोबरे देती उधळून

माहेरवाशिणी फेडी नवस

नैवेद्य गोडाचाच ओवाळून


लागती दुकानं सत्राशेसाठ

शेवफरसाण कुरमूरे बत्ताशे

पोरीबाळी येती खरेदीसाठी 

पोरं वाजवती पिपाणी ताशे


दोन दिवसांची जंगी जत्रा

चांगभलंचा देती सर्व नारे

पुढल्यावर्षी येऊ फिरून

आठवण घेऊन परते सारे


साहित्याला गुण द्या
लॉग इन