गाव
गाव
दर्याचा गाव असे जीवदानी
सागर किनारी वसले गाव
गाव माझं अर्नाळा जवळी
माणसाची जपतील माया
माया माणिक न मासोळी
सागराच्या लाटा अवखळ
अवखळ वारा संगे खाडी
कोळ्याची जात नारंगीची
नारंगी गाव ताडाची वाडी
ताडामाडाची असे सावली
सावली ही माझी जीवदानी
प्रसिद्ध गाव सागरी धनाची
धनात धन सुख मायेचं धनी
जीवदानीच्या पायथ्याशी
पयथ्याशी घर सात खाणी
सागाची न आंब्याची वाडी
वाडी भरली गं माणसानी
मायेच्या माणसाची ना कमी
कमी नाही पैसा पाण्यानी
फुलाफळांचा डोंगर दर्याचा
दर्याचा गाव असे जीवदानी
नावात नाव प्रसिद्ध गाव
गाव वसई विरार अर्नाळा
प्रसिद्ध इथली विरार-वसई
वसईची केळी नारळी पोफळी
बाजारहाट भारी गाजतो
गाजतो बयोचा गं ठसका
बायकांच असे अधिराज्य
अधिराणी दावते स्त्री हिसका
