गाऊ या प्रीतीचे गीत
गाऊ या प्रीतीचे गीत
कळी प्रेमाची फुलायला नसते काळवेळ
वय, दर्जा नाही पहात जमता ताळमेळ
साद मिळता हवीशी रंगतो प्रीतीचा खेळ
जाणाया प्रीतीचे रंग असावे मन निर्भेळ
पैसा प्रतिष्ठा ठरे गौण प्रीतीच्या अंमलात
जात धर्माचा अडसर आजही मुलुखात
महालाची आसक्ती कधी जन्मते झोपडीत
स्वप्नांची नसते चुकी पाहण्याच्या आवडीत
विद्रोहाचा जन्म असतो खऱ्या प्रीतीच्या ठायी
मान्य असेल कां समाजाला कौल समन्यायी
विषमता पेरते अस्वस्थता कृती अन्यायी
मनमीत मिळता फुलून ये यौवन स्थायी
मापदंड ठरलेले मुभा न कोणाला इथे
लक्ष्मणरेषा आखीव अदृश्य बंधनी गुंते
मानव्य जिथे गाऊ प्रीतीचे गीत मुक्त स्वरे
सांगावे जगास प्रेमात जगणे हेच खरे
