STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

गाते मी गाणे

गाते मी गाणे

1 min
344

गाते मी गाणे 

पण गीत हे माझे अबोल आहे.

अबोल गीत जरी हे 

सूर माझे बेसूर आहे.

कारण तुझे नसणे म्हणजे 

अवघड गीत हे बनले आहे 

कारण मला ना कळेना 

शोधुनी गीत माझे 

मन माझे लागेना 

सूर माझे विरून गेले 

गाणे माझे थांबले होते 

अंधाऱ्या रात्रीत मात्र 

शिल्लक होता हुंदका माझा 

तिला मात्र सगळे कळले होते 

कारण सोबत माझ्या राहुनी 

माझ्या कवितेचे तिला

 थोडेफार ज्ञान झाले होते 

शब्दावाचुन कळले तिला भाव सारे 

कळले तिला थोडेफार क्षितिजाचे अंतर होते डोळ्यातले अश्रू पाहून नकळत 

तिच्या डोळ्यात तरळताना मला दिसले

 हळूहळू चंद्र साक्षीला आमच्या होता 

तोही जाणत होता विरह आमचा

विराण आता सगळे आयुष्य आमचे 

गीत आमचे हे मात्र अबोलच राहिले


Rate this content
Log in