STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

गारवा हवाहवासा

गारवा हवाहवासा

1 min
388

दुपारच्या रखरखत्या उन्हात

सावलीला मिळे हवासा गारवा |

वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी

सुगंधी फुले व घुमणारा पारवा | |


गोड वाटे अशातच पडता 

कानी राग मारव्याचे स्वर |

नकळत का शिंपडले कुणी 

हवेतच जणू सुगंधी अत्तर | |


वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागली तर दुपारच्या रखरखत्या उन्हात सावलीत मिळत जातो. सुगंधी हवाहवासा वाटणारा तो गारवा, राग मारवा व घुमणारा पारवा!


Rate this content
Log in