गाफील
गाफील
1 min
177
कोरोनाची ही लाट ओसरली
म्हणून कुणी गाफील ना राहावे
सुरक्षित अंतर तोंडावर मास्क
नेहमी आपले हात स्वच्छ धुवावे
विनाकारण बाहेर फिरण्यापेक्षा
आवश्यक कामासाठी बाहेर पडावे
सर्वात सुरक्षित आहे आपले घर
बाहेरच्या गर्दीत जाणे टाळावे
काही दिवस तरी स्वतःला आवरा
कोरोनाचे सारे नियम पाळावे
आपल्याच चुका पडतील महाग
जागरूक राहून शहाणपणाने जगावे
