STORYMIRROR

Anil Chandak

Others

4  

Anil Chandak

Others

गांव शिवाराचे जीवन

गांव शिवाराचे जीवन

1 min
353


पहाट ,गांवाकडची जागते,

मंदीरातल्या ,गोड भजनांनी!

सुस्वरात भूपाळी,दिर्घ आरती,

टाळ चिपळ्यांच्या,तीव्र स्वरांनी!!1


शेणाने, सारविलेल्या अंगणी,

सुबक नक्षीत,रंगीत रांगोळी!

गोठ्यात बांधल्या,गाईम्हशींनी,

कापलेल्या पिकांनी,भरली खळी!!2


पुर्वी चंद्रमोळी,झोपडीत,

झोप, सुखाची लागायची !

झोपड्या जाऊनी,बंगले झाले,

झोपडीची सर,त्यांस कशी यायची!!3


तंबाखु चुन्यावर मळत, झटका मारूनी,

पारावरती,गप्पा रंगायच्या !

वादविवाद, हंसत खेळत भांडणे,

राजकारणी,गांवातल्या,तालुक्याच्या!!4


पुर्वी असायचे,पशुधन एखादे दुखादे,

आता मोठमोठे, गोठे झाले !

दुग्ध क्रांतीची ,साथ हरिताला,

समृद्धीने ,बळीचे घर भरले !!5


पुर्वी बाज ,टाकुनी अंगणामधी,

उघड्यावरती,झोप घ्यायची !

रात्री,नभीच्या चांदण्या मोजत,

सुख दु:खे, घरच्यासवे वाटायची !!6


आडामधले,पाणी हाताने ओढणे,

सारे आता ,कालबाह्य झाले !

इलेक्ट्रिक मोटारींनी,पाणी उचलुनी,

पाईपने,शेतात ,अन घरी खेळविले !!7


 मंदीरात जाती,फक्त जुनी पिकली पाने,

टिव्ही,मोबाँईलने सारे हरवले!

बाईक, ट्रँक्टर,चारचाकी वाहनानी,

गांवाचे गांवपण ,ही हरवले !!8


खांद्यावरती,पदर स्रीयांचा,

मान ठेवीती वडीलधाऱ्याचा!

सण ,संस्कृती जीवापाड जपण्याचा,

स्रीयांच्या,शील,अब्रु रक्षिण्याचा !!9


ग्रामदैवताच्या,जत्रेत एकजुट होते गांव,

किर्तन,अखंड हरीनामात,रंगुन जाते गांव!

कधी कुणावर,येता दु:खाचा प्रसंग,

मदतीला,धावुनी जाते गांव !!10


तरी ही, आज ही शेतकामाची,

लगबग, सतत, चालुच असते!

जगाचा पोशिंदा ,पिकासाठी घाम गाळतो,

उपकार कधी त्यांचे,विसरायचे नसते !!11


Rate this content
Log in