STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

गागरा

गागरा

1 min
351

गोंधळच उडाला माझा

गागऱ्याचा आला लोट

उडाले कपडे नि कचरा

झाली कामाचीही खोट


वैतागली बायामाणसं

डोळ्यातच गेला कचरा

चोळून डोळे होता लाल

अश्रुंचाही झाला निचरा


सुचेना साऱ्यांना काहीच

करावा काय बरे उपाय

जमले सारे एका जागी

माझा घरी बसण्या पर्याय


शमले वादळ यथावकाश

गागराही जमला भूईवर

केसांत बसला अडकून

ढीग जमला मग डोईवर


पावसाचे घटलेय प्रमाण

जलसंचयही आपण करू

गागरा खाली बसवायला

त्यावर पाण्याचा मारा करू


साहित्याला गुण द्या
लॉग इन