STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

गागरा

गागरा

1 min
766

जीवनपटलावर मागे वळून पाहिले

गतकालीन दिवसातच रमले

गागरा जरा झटकला स्मृतीवरचा

प्रकाशझोतातील दिन आठवले....


सर्रकन सरकला प्रवास पन्नाशीचा

लहान असताना कौतुक खूप होणारे

जरा मोठी झाल्यावर पुस्तकांच्या राज्यात 

दिवस रात्र गोष्टीत रमणारे....


वाचून पुस्तक त्यातील 

अनमोल क्षण वेचणारे

त्या क्षणातच आम्ही मुले 

सतत गुंगून जाणारे.....


मोठी झाले,लग्न ठरले 

बोहल्यावर पतीसोबत उभी राहिले

संसार झाला सुरू आता 

मौजमजा करू लागले....


कुटुंबासहित आनंदाने 

सुखात दिन चालले होते

संसारात फुलली तीन मुले

मुलांचे कौतुक डोळा भरून पाहते.....


नजर लागली संसाराला 

पती सतत आजारी पडू लागला

पैसा अडका पाण्यासारखा त्यांच्यावर

सततच खर्ची पडायला लागला....


अजूनही हेच चालू आहे सध्या

आजारपण,शाळा,घरदार सारे

पाहू लागले,त्रेधातिरपीट झाली जरा

पण हे सारेच होते हो मला खूपच न्यारे....


आज दिलेल्या विषयामुळे 

मनःपटलावरील धूळ जरा सारली

गागरा सारल्यावर दृष्ये स्थिर झाली

लांबवर नजर जाताच गतकालात विसावली....


साहित्याला गुण द्या
लॉग इन