STORYMIRROR

Suhas Bokare

Others

4  

Suhas Bokare

Others

एकवीस गंधाचे

एकवीस गंधाचे

1 min
257

नववर्ष रास नाचे.

नववर्ष राधिकाचे.

कृष्णास हाक मारी.

अवनीच राधिका रे.


अंदाज हा कुणाला.

कान्ह्यास ओळखाया.

राधा जपून नाचे.

शोधित निलिमि काया.


वर्षीच मागल्या रे.

दिसलास नाही ना रे.

युगात नाही घडले .  

का हे आता घडावे.


नववर्ष छान जा रे.

सुखात गान गा रे.

ही हाक राधिकेची.

आतील वेदना रे.


वनवृंद  भावनांचा.

परसात वासराचा .

स्वर हा तरुण आहे.

नवसाल बासऱ्यांचा!


रडतात बालके रे .

निष्पाप कोकरांनी .

एक वर्ष रांजणास.

बांधून का रहावे?


विसरेन ना कधी ही.

शिवताच रोग आली.

धरणी वरी सदी ही.

कुलपात बंद झाली.


विषजन्य हा विषाणू.

न्यावे खात्म्यास.

चक्र फेकुनी च हाणू.

सुदर्शन चक्र आणू!


करताच घोष त्याचे.  

पाऊल काळजीचे.

एकवीस गंधाचे.  .

वर्षच आनंदाचे !



Rate this content
Log in