एकटी मी
एकटी मी
1 min
522
एकटेच शब्द माझे
सोबतीला नाही कुणी
डोळ्यातल्या अश्रूंना
पुसायला नाही कुणी
सांगू कुणाला मी
भावना तरी माझ्या
ऐकायला नाही कुणी
शब्द मांडू तरी कसा
एकटी पडली मी
शब्द उचलू तरी कसा
जवळ नाही कुणीही
प्रेमासाठी भांडू तरी कसा
ओढ आहे तुझी आता
घेशील का रे मला जवळ
आपलं बनवून नेहमी
ठेवशील का रे सोबत
