एकटी मी
एकटी मी
1 min
193
एकटीच फिरते आहे मी या अंतराळी
भरून निघेल कधी माझ्या मनाची पोकळी
या पोकळीत मनाच्या तुजला भरावे
मुकलीच मी तुला आता फक्त आठवावे
ह्या पार्थिव शरिरात उरले ना प्राण
निर्जीवा प्रमाणे जगते आहे घालते तुझी आण
तुझ्या विना जगणे कठिण आहे
तुझी आस धरूनी आता वाट मी पाहे.
