STORYMIRROR

Mohini Limaye

Others

4  

Mohini Limaye

Others

एकदा तरी जग स्वत:साठी

एकदा तरी जग स्वत:साठी

1 min
536

जन्माला येतेस आई वडिलांच्या सुखासाठी

त्यांना सुख देतांना जगत असतेस कुळासाठी


बहिण होतेस भावाची देण्या त्याला प्रेमासाठी

भाऊरायाची ताई होतांना जगत असतेस भाचरांसाठी


पत्नी होतेस कोणाची शय्यासोबत करण्यासाठी

होतेस दुसऱ्या घरची सुन जपण्या त्यांच्या घराण्यासाठी


आई होतेस सुखावतेस झटतेस त्या लेकरांसाठी

सतत पाठपुरावा करतेस त्यांना संस्कार देण्यासाठी


सासु होतेस जबाबदार सुनेला सांभाळून घेण्यासाठी

रमून जातेस नातवंडांत मुलाचा संसार फुलवण्यासाठी


अगं बघ ह्या सगळ्यात तुझे अस्तित्व फक्त इतरांसाठी

असतील ते तुझेच तरीही तू जगणार कधी ग स्वतःसाठी


झटकून टाक पाश हे सारे झेप घेण्या उंच

गगनी हो मुक्त हो लुप्त हो बेधुंद

एक गगनभरारी घेण्या तव प्रांगणी


Rate this content
Log in