STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

एका मताची ताकत

एका मताची ताकत

1 min
450


एक मत बनवू शकते रंकाला ही राजा

एक मत वाजवू शकते राजाचाही बाजा

एका मताने कधी बनतो रंकाचा राव

एक मताने खाली येतो रावा चा भाव

एक मताने भली भली

राज्ये ती गडगडली

एक मताने घराणेशाहीची संस्थाने पडली

एकमताने जगतामध्ये

मान देशाची ताठ

एक मताने कित्येकांची लावलीच वाट

एकमताने दाखवून दिली खोट यांना आपली जागा

पडले तरी नाक वर म्हणती करती ते त्रागा

भल्याभल्यांना भुईसपाट केले एका मतांनी

जनतेचा कौल मान्य करावा शांतपणे त्यांनी

शेवटी सत्याची कधीतरी

होतेच की जीत

कळणार कधी तुम्हाला एका मताची ताकत

सोळाव्या शतकात कोणी केले होते भाकित

कळली का आज तुम्हाला

एका मताची ताकत



Rate this content
Log in