STORYMIRROR

भास्कर आग्रे

Others

4  

भास्कर आग्रे

Others

एक तरी काव्याला प्रतिसाद देणार

एक तरी काव्याला प्रतिसाद देणार

1 min
283

मुहुर्तमेढ रोवली समुहाची

जुने,नवे कवी लाभले सोबतीला,

काव्य करण्या घेऊन बसलो

हाती सुंदर लेखणीला !!


विषयाला साक्षी मानुन

कवी रचतो पाया काव्याचा,

एक तरी काव्याला प्रतिसाद देणार

असा निश्चय करा मनाचा !!


काव्यरचनेच्या नौकेचा

प्रवास नक्की कसा असावा,

आपणासं नक्की कळेल

लेखणीचा आदर कसा करावा !!


शब्दांची सांगड घालता

उडते मनाची तारांबळ,

नवनवीन शब्द सुचता मनी

येतं दहा हत्तीचं बळ !!


कवी,कवियित्रींच्या रचना वाचुन

सन्मान देवु त्यांच्या लेखणीला,

सोपं नसतं शब्दांना घडवणं

भार द्यावा लागतो बुद्धीला !!


कवींना होऊ द्या त्यांच्या

जीवनाचे शिल्पकार,

सन्मान देवु त्यांच्या काव्याला

आपण होवु त्यांच्या यशाचे साक्षीदार !!


Rate this content
Log in