Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Others

4.0  

Rakesh More

Others

एक सूर्य दलितांचा

एक सूर्य दलितांचा

1 min
107


एक सूर्य आभाळाचा

एक सूर्य दलितांचा

दुःखितांचा शोषितांचा

गांजलेल्या पीडितांचा ||0||


प्रकाशाने विद्वत्तेच्या

सारा समाज दिपला

ज्ञान त्याचे तेजोमय

सारा अंधकार विझला

स्वाभिमान जागविला

हीन दीन गरिबांचा ||1||


हीन पशूहून जिणे

कोण बंधने ही तोडी

दिवसागणिक अधिक

झाली बिकट ही कोडी

चक्रव्यूहभेदक तो

मनुवादी गणितांचा ||2||


परिचय गुलामांचा

गुलामीशी करविला

एक अविस्मरणीय

इतिहास घडविला

गौतमांचा ज्योतीबांचा

शिष्य संत कबीरांचा ||3||


रात्रंदिनी जागुनी

त्याने ज्ञान संपादिले

अस्पृश्यांच्या शोषणाचे

कारण त्याने जाणिले

मूकनायक महान

बहिष्कृत भारताचा ||4||


कसे व्हावे स्थित्यंतर

काळ तेथेच थांबला

सत्ताधारी मनुवादी

का हा एवढा माजला

एक सम्राट ज्ञानाचा

श्वास तोच अंत्यजाचा ||5||



Rate this content
Log in