एक संध्याकाळ
एक संध्याकाळ
1 min
353
एक संध्याकाळ
तुझ्या नावाने
देईन म्हणते!
मी पुन्हा एकदा
तुझ्या आठवणीत
जगीन म्हणते!
तुझ्या अचानक जाण्याने
आयुष्यात झालेले बदल
पुन्हा एकदा तपासिन म्हणते!
बेरीज, वजाबाकी, हिशोब
ताळा झाल्यावर पुन्हा
डोळाभरून तुला पाहिन म्हणते!
एक संध्याकाळ पुन्हा एकदा
कितीतरी वर्षांनी फक्त तुलाच,
तुझ्या आठवणींना देईन म्हणते!
