एक निरर्थक बावडी
एक निरर्थक बावडी
कसं अन् कुठे हे जीवन
निसटून जाती हातून क्षण
तडफडते का जीव जगण्याला
आशा धरुनी आधाराला
काही मिळत का तमा धरुनी ह्या आयुष्या
जेव्हा सगळं निसटून जाती हातून
फक्त श्वास हा अडकतो त्या निराशेत
भास होत असे ह्या जगण्यातला
जन्म मिळतो हा आपल्याला
वाटलं ह्या जन्माच सोनं करूनी
उगाच ही मी तमा बाळगली
इथे तर दिसे मी कोणी कोणाचे
तडफडते मी भल्या करण्या
बरीच मरणे भोगली ह्या जन्मी
सुखाची आस मनी ठेऊनी
मात्र कधीही परिणामाची तमा ना बाळगली
आस ठेऊनी सोबतीकडून
तसेच आशेत जगवणारे आधारी शब्द
तसं पाहता होत काही नसतं
शांतपणे ते मारू पण देत नसतं
आशा ठेऊनी मी मनाशी
चालत आहे माझ्या ह्या एकल्या मार्गातून
माझी मलाच ह्या जगात वगळून
मी एक निरर्थक बावडी
