Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Others

5.0  

Rakesh More

Others

एक क्षण

एक क्षण

1 min
152


एक क्षण, जो विसरता येत नाही

एक क्षण, ज्याचा पूर ओसरता येत नाही

एक क्षण, जो सारं आयुष्यच व्यापून टाकतो

एक क्षण, ज्याचं बोट धरता येत नाही ||1||


एका क्षणाची आठवण, दवबिंदूसारखी जपतो

एका क्षणापासून मात्र नजर लपवतो

एका क्षणात हरवून जावंसं वाटतं

एका क्षणाला मिठीत घ्यावसं वाटतं ||2||


एक क्षण, काळीज चिरून जातो

एक क्षण, भूतकाळात विरून जातो

एक क्षण, हवाहवासा वाटतो

एक क्षण, दूर जावासा वाटतो ||3||


एक क्षण, मनात सामावून जातो

एक क्षण, हुरहूर लावून जातो

एक क्षण, फार त्रासदायक ठरतो

एक क्षण, आठवणीत ठेवण्यालायक ठरतो ||4||


एका क्षणाला, कुरवाळत राहतो

एका क्षणाला, मनात जाळत राहतो

एक क्षण वेदनेला बांध घालतो

एक क्षण, क्षणोक्षणी बरोबर चालतो ||5||


एक क्षण, मन विषण्ण करून जातो

एक क्षण मनात प्रेमवर्षावात नहातो

एक क्षण फक्त क्षणच राहतो

एक क्षण मनात ओसंडून वाहतो ||6||



Rate this content
Log in