SHANKAR MEDGE

Others


3  

SHANKAR MEDGE

Others


एक कळी

एक कळी

1 min 145 1 min 145

एक कळी पावसाच्या थेंबावर भाळली

स्पर्शताच त्याने, ती लगेच खुलली..

त्याच्याही डोळ्यांत तिचे प्रतिबिंब पाहून

प्रेमाची संमती तिला कळली..


क्षणात दोघांचे प्रेम बहरले

आनंदाने फुल सर्वत्र दरवळले..


अचानक तिथे वारा सळसळला

पावसाचा थेंब जागीच थरथरला

पाहून त्याला फुलाचा जीव व्याकुळला..


थेंब क्षणार्धात कोसळणार हे कळले

फुलाने लगबगीने थेंबाला उराशी धरले..

दोघेही फांदीवरून खाली ओघळले

क्षणात दोघेही मातीत मिसळले..


जगावेगळे त्यांचे प्रेम कोणाला नाही कळले

मातीने मात्र सारे काही पाहिले

आता जेव्हा जेव्हा थेंब मातीवर पडतो

फुलाचे प्रेम आठवून मातीतून मृदगंध दरवळतो...


Rate this content
Log in