आई
आई

1 min

272
कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई
आकांत श्वासांत, शांतता कुजबुज टाळे माझे ..आई
ना शून्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई
असे जवळ - तसे दूर भाबडे अंतराळ माझे ..आई
कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई
असेल - आहे - असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई
अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई
अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई
कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई