असा कुठला क्षण नाही
असा कुठला क्षण नाही
1 min
230
असा कुठला क्षण नाही,
तुझी आठवण येत नाही,
अशी कुठली आठवण नाही,
ज्यात तु येत नाही.
कुठला गैरसमज करुन घेतेस,
का एवढी विरहात राह्तेस,
आजकल स्वप्नांमधे पण
तुच असतेस.
मला ठावूक आहे,
रात्री झोपण्याचा तु प्रयत्न
करतेस,
अंगावर गोधडी घेऊन
आठवणीत रडतेस.
जरी तु दूर असशील
माझ्यापासून
तरीही नेहमी माझ्या
मनात असतेस.
कारण फक्त तुझी
आणि फक्त तुझी
आठवण असते.
