STORYMIRROR

SHANKAR MEDGE

Others

3  

SHANKAR MEDGE

Others

एका आईची अंत्ययात्रा

एका आईची अंत्ययात्रा

1 min
221

आता सर्व काही आठवेल तुला

अगदी सर्व सर्व..

कदाचित रडशीलही

प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..

तुला जन्म दिला होता

याची परतफेड करशील..

मान खाली घालशील

शरमेने..


खांद्यावर घेशील तेव्हा

तहान शमेल मस्तकातली..

किनार्‍यावर पोहोचवशील

पाचव्या इसमाच्या मदतीने..

हे करतांना क्षणभर का होईनात

पण..

आठवेल का रे तुला

माझा खांदा..?


घामांच्या धारांतून वाहणारा माझाच अंश

तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल

नकळत..

तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रे

तुला..?


सर्व काही रितसर पार पाडशील

उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी..

जाळशील आणि जळशील

देखावा सजवशील, अखेरचा..

माझा आणि तुझाही

माझा आणि तुझाही..

- तुझी प्रेमस्वरुप आई


Rate this content
Log in