STORYMIRROR

Babu Disouza

Others

3  

Babu Disouza

Others

एक खिन्न दिवस

एक खिन्न दिवस

1 min
231

मनाविरुद्ध सारे घडताना येते निराशा 

बदललेली दिसते जेव्हा आपल्यांची भाषा 


दुरावता प्रिय भेट दुरापास्त ये हताशा

गळता बहर झाला तो जीवनाचा तमाशा


हरले उपचार पडेना उतार जराही

महामारी देशात गिळते प्रियजनांनाही


रूग्णवाहिकेचे आवाज भरविती धडकी

प्राणवायू अभावी मने हतबल चिडकी


कोविड ने भरली सारी इस्पितळे सेंटर

भरती होईना नातेवाईकांची भिरभिर


अक्षम्य केले दुर्लक्ष बेफिकीरीने भोवले

 अपूरी साधने राज्यभर वादळ उठले 


जिथे तिथे गर्दी मास्क न लावता व्यवहार

ना नियम पाळले स्वतः उपचारांची हार


गांभीर्याने ना घेतले आदेश जारी केलेले

आपल्यासह प्राण अनेकांचे धोक्यात आले


Rate this content
Log in