एक होता छबू
एक होता छबू
1 min
197
अंगावरती सुरकुत्या
करून तोंडाचा चंबू
सांगते पहा
एक होता छबू
भलताच ढबू
तेच काय सांगतेस गं आजी
दुसरं काहीतरी सांग पाहू
अरींग मिरिंग लवंगा चिरींग
चिरता चिरता डुगडुग बाजा
गाय गोफ उतरला राजा
आजी... गं ...आजी ....
एवढी मोठी आजी
गोड गोड गाण्यातून रुजवते
संस्कारांची अनमोल पुंजी
आजी की तू हरवलेली दुधावरची साय
आई भासे साखर मजला,
आजी मध असते काय ?
आजी तूच कविता, गोष्ट आमची
आई बाबा प्रेमाचे चार आणे,
आजी तू मायेचा रुपया
