एक एवढंस स्वप्न
एक एवढंस स्वप्न
खरं च रे देव बाप्पा,
एक एवढंस माझं स्वप्न पूर्ण कर,
पुन्हा एकदा मला लहान कर,
काय म्हणतोस नाही जमायचं....?
मग एक request आहे.!!!!
ती तरी मान्य कर
प्रत्येक खटकणारी गोष्ट,
विसरून जाण्याचं तू मला ध्यान कर.
खरं च रे देव बाप्पा....
नाहीचं आलं करता कोणाचा
चांगलं मला तर,
किमान वाईट न करण्याच
ज्ञान मला तू दान कर,
खर चं रे देव बाप्पा.........
सर्व सुखसोयी,गाडी,पैसा,प्रसिद्धी
याने म्हणे माणूस श्रीमंत होतो
(पण समाधानी असतो का?),पण
खरं सांगू का बाप्पा...?
यातलं गरजेपुरत सगळं
काही तूच मला दिलंय.
फक्त एवढं कर ;
तुझ्या सानिध्यात असणारी माणसं
माझ्या सानिध्यात कायम राहू दे,
त्यांची आणि तुझी सेवा करण्याचं
वरदान मात्र मला लाभू दे.
खरं च रे देव बाप्पा........
एक एवढंस माझं स्वप्न पूर्ण कर.
