STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

एक चहा असाही...

एक चहा असाही...

1 min
228

मायेच्या रोपट्यांचा फुलला 

हिरवा हिरवा मोहक मळा... 

पाहुनी स्वप्नांचा सुगंधी देखावा 

झाला मशागतीचा सोहळा... 


प्रक्रियेच्या विश्वासू प्रेमातून 

चहाचा झाला जन्म साकार... 

एक चहा असाही गाजला 

ज्याचा मायाळू देह आधार... 


सुंदर, आकर्षक अशा नावाने 

गेला घराघरात बहू वेशात...

भेटले त्यासी निरनिराळे नाते 

थाटात जपणारे जणू देव रूपात... 


अनेकांसाठी गाळला गेला 

प्रेमळ नजरेतल्या गाळणीतून... 

प्यायला गेला गरम गरम चहा 

ओठांच्या रसरशीत कपबशीतून... 


एका एका मधुर घोटासोबत 

फुलत गेला नात्यांचा पिसारा... 

एक चहा असाही गोड उपजला 

ज्यातून हसला संसार सारा... 


Rate this content
Log in