एक असामान्य इंजिनीअर
एक असामान्य इंजिनीअर


राईट बंधूंच्या खांद्याला खांदा तो देतो,
विमाने नाही तर क्षेपणास्त्र तोच तयार करतो,
इंधनाची नाही तर दाबाची उर्जा तो निर्माण करतो,
आणि तोच वैमानिक अभियांत्रीकी म्हणुन ओळखला जातो.
काचेच्या उंच-उंच इमारती तोच उभा करतो,
घरांना वेडे-वाकडे आकार देऊन शोभा वाढवतो,
कमी खर्चात नव्हे तर कमी जागेतही आश्चर्यकारक निर्मिती करतो,
आणि त्याला आपण सिव्हील अभियांत्रीकी म्हणतो.
रोज नवनविन माहिती तोच संकलन करतो,
अनेक धातुंचा नव्हे तर त्याच्या पुर्वजांना विचारतो,
मानवाचीच नव्हे तर निर्सगाचीही माहिती चंचुपात्रात दाखवतो,
रसायन शास्त्रासाठी मात्र रसायन अभियांत्रीकीच लागतो.
अमेरीकेतल्या माणसाचे भारतात काॅल जोडतो,
यंत्रमानवास देखील कामाला तोच लावतो,
एका भाषेत नव्हे तर दहा-दहा भाषेत कामे तो करतो,
म्हणुन आम्ही त्याला संगणकीय अभियांत्रीकी म्हणतो.
दिवस-रात्र विजेच्या तारेसोबत तोच खेळतो,
गावांच्या प्रत्येक काणाकोपऱ्यात विज तोच पोहोचवतो,
तो अडकला तर प्रत्येकाचे काम तो अडकावतो,
आणि त्याला आपण विद्युत अभियांत्रीकी म्हणुन ओळखतो.
खुप सारे विद्युत उपकरणे आपण कायम वापरतो,
भल्यामोठ्या संगणकाचे रुपांतर तांदळाच्या आकारात करतो,
सर्व यंत्रांनीच तुमचे आयुष्य भरभरून टाकतो,
कारण तो इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी असतो.
प्रत्येक उपकरणाची योजना, आराखडा तयार असतो,
जगातली प्रत्येक वस्तु आम्हीच तयार करतो,
प्रत्येक वस्तुची मागणी आम्हीच पुर्ण करतो,
म्हणुन संपुर्ण जग आम्हाला
यांत्रिक अभिसांत्रिकी म्हणुन ओळखतो.
अभियांत्रिकी मध्ये आहेत हजारो प्रकार,
मिळतो त्यामुळेच प्रत्येक वस्तुली उकार,
दिला आम्हीच या जगाला अनोखा आकार,
मिटवले आम्ही त्यामुळेच वेळेच्या बंधनाचे विकार.
सगळीकडेच वापरतो आम्ही भौतीकशास्त्र,
तेच आहे आमच्या अनोख्या यशाचे अस्त्र,
खुप येतात हो आमच्या जीवनात विकट योग,
पण आम्ही सोडत नाही करायचे प्रयोग.
बारा-तेरा विषयांचा अभ्यास आम्ही स्वत: करतो,
प्रॅक्टिकल्सना आम्ही वेळेवरती पोहोचतो,
असाईनमेंटस् आम्ही मात्र उशीरा सबमीट करतो,
त्यामुळेच आम्ही इंजिनीअर म्हणुन ओळखतो.
मित्रांसोबत त्या टपरीवरचा मसालेदार चहा घेतो,
मैत्रीणी सोबत कॅफेत जाऊन काॅफी आम्ही पितो,
रातोरात प्रोजेक्टचे कामकाज आम्हीच पुर्ण करतो,
आणि इंजिनीअर आहोत म्हणूनच वेगळे काम करतो.
चार वर्षांमध्ये आगळे-वेगळे अनुभव आम्ही घेतो,
दोस्ती-दुनियादारीचे अनेक धडे आम्ही शिकतो,
वेळ आलीच तर संपुर्ण सिल्याबस आम्ही रट्टा मारतो,
आणि एक इंजिनीअर ॲाल क्रिअर राहण्यातच आयुष्य घालवतो.
हो बरोबर आहे नाही मिळत इंजिनीअरला घर,
भिजवून जातो तेव्हा त्याला दुःखी पावसाचा सर,
आणि एक दिवस नक्कीच असा येणार,
इंजिनीअर ताठ मानेने संपुर्ण जग फिरणार.
त्या वेड्यावाकड्या जगाकडे आम्ही पाहतो,
नेहमी जगामध्ये नवनविन तंत्रज्ञान आम्हीच विकसित करतो,
प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही आमची गरज भासवतो,
आणि “मी एक इंजिनीअर आहे” हे आम्ही अभिमानाने बोलतो