STORYMIRROR

harshada joshi

Others

4  

harshada joshi

Others

एक अनामिक भीती

एक अनामिक भीती

1 min
278

फारशा काही अपेक्षा नाहीत 

माझ्या आयुष्याकडून 

जे जे पुढ्यात आलं

ते ते जगले भरभरून 


भीती वाटते फक्त एका गोष्टीची 

नशिबातल्या चढउतारांची 

अचानक समोर येऊन उभारणाऱ्या 

त्या काळ नि वेळेची 


बेसावध या जीवननौकेला 

धक्का देऊन उध्वस्त करण्याची 

एक अनामिक भीती वाटते,

नशिबाचे फासे उलटसुलट पडण्याची


पुढे काय वाढून ठेवले असणार?

कळे ना ही गती कर्माची

माझे, आपले बरोबर असतील तर 

येऊ दे संकटे हजार 

ताकद आहे त्यांना कवेत घेण्याची


आपल्याच माणसांच्या विरहाग्नीत 

कुठून आणावी शक्ती जळण्याची

मायेची माणसंच नसतील 

तर दाटते भीती 

सारं काही जिंकूनही हरण्याची


Rate this content
Log in