एक आभाळ मोकळे
एक आभाळ मोकळे
1 min
440
एक आभाळ मोकळे
पुन्हा कवेत घेतले
घेण्या उंच उंच भरारी
पुन्हा पंख पसरले
ह्या मोकळ्या आकाशी
खूप उंच उंच जावे
सर्वांवर मात करूनी
सर्वांत पहिले यावे
आयुष्याच्या या शर्यतीत
आपणही सहभागी व्हावे
स्वतःस सिद्ध करण्यास
खूप खूप दौडावे
मोठेपण विसरुनी जरा
लहानपण आठवावे
सर्व जग विसरूनी
आपणही लहानगे व्हावे
सुख दुःख येते जाते
नेहमी हसतच रहावे
सत्याची वाट धरून
असत्याशी झुंजावे
