STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

दयाघना

दयाघना

1 min
200

तुझ्या प्रीतिची ओंजळ

सदैव ठेवतो तू भरलेली!

कितीही करतो रिकामी

परी दिसत असे उरलेली!!१


रितं होता सारं काही

तरीही नित्य देत राही!

पांघरूण जरी तुझेच

अंथरूण आम्हा नाही!!२


तुझ्या दातृत्वाची आज

किंमत कुणालाच नाही!

कित्येक गेले पावसाळे

पाणीच साठवले नाही!!३


कधी झालाच दुष्काळ

शेतकरी मरायला पाही!

त्याच्या मरणाचा आळ

तुझ्यावर टाकला जाई!!४


वृक्षतोड होते कितीक

त्याची गणतीच नाही!

झाडं पुन्हा लावायला

कोण पुढाकार तो घेई?!५


थोडाफार दानशूरपणा

आमच्यातही येऊ देत!

श्रेय बीज रुजवण्याचं

त्या धरतीला घेऊ देत!!६


Rate this content
Log in