दूर्गा शक्तीची आरती
दूर्गा शक्तीची आरती
माते भवानी माहेश्वरी
माते भवानी सर्वेश्वरी
आरती ओवाळीते तूज दुर्गाशक्ती
कृपासागरी, करूणासागरी
तूच अमुची पालनकर्ती
सत्यम तूच शिवमं सुंदरम्
तूच दवबिंदूमधले जलकण
श्रद्धामूर्ती सुक्ष्म मंडलम्
रूप तुझे गं जगदंबे माता
सूर्यकिरणे जशी अतिसुंदर
पूजन करी देेव, गंधर्व अन् मानव
तू सकलांची क्षुधा उद्धार, स्नेहसागरी
भूतभविष्य सावर आता
तूच सुखाची मंडीत आभा
तेजभरूनी पंख देवूनी
साज दे या संसार सभा, सुखदसागरी
माथा तव चरणी ठेविते
धूपम्, दिपम् सुगंध तेवते
मंदिरी ओवाळीते आरती
मनगोजिरी ह्रदयफुले वाहते, दयासागरी
