STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

दुष्काळात तेरावा महिना

दुष्काळात तेरावा महिना

1 min
308

हल्ली फार भेडसावतोय

ओला व सुका दुष्काळ!

तमाम जनतेसाठी ठरतोय

जणू त्यांचाच कर्दनकाळ!!१


अतिवृष्टी कधी करी बेजार 

कधी भेडसावतेय अनावृष्टी!

कमी अधिक प्रमाणात येथे

धोक्यात येतेय सजीवसृष्टी!!२


पाण्या अभावी पीक करपते

तहानेने व्याकूळ प्राणिजात!

अतिवृष्टी ने विस्कळीत जिवन

पिकांसवे पशुधन वाहुन जात!!३


पाण्यासाठी कधी होते वणवण

सर्वस्व हिसकावून घेतो महापूर!

रोगांचा प्रार्दुभाव, जिवितहानी,

महागाईचा छळतो भस्मासूर!!४


शेतकरी,कर्जबाजारी घेतो फास

समस्या त्यात वाढती बेरोजगारी!

मुलामुलींची शिक्षण लग्न कार्य

कमी कमाई वाढे जबाबदारी!!५


यावा दुष्काळात तेरावा महिना

तसे लग्न सण समारंभ येतात!

उरलं सूरलं तनातलं शेतक-यांचे

सारं अवसानंच काढून घेतात!!६


दिवसेंदिवस जगावर दुष्काळाचे सावट पसरत आहे. अतिवृष्टी तर कधी अनावृष्टीचे दुष्परिणाम या जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करत आहे!


Rate this content
Log in