दुष्काळ
दुष्काळ
1 min
245
कृषिप्रधान देशात
शेती हाच व्यवसाय,
दुष्काळाची समस्या
शेतकरी होई असहाय.
पाण्याची कमतरता
वर्षानुवर्षे भासे,
कारण याचे एकच
पाऊस कमी दिसे.
जंगलतोडीचा प्रकार
हव्यासापायी संसाधने,
मानव करी अतिवापर
दुष्काळास देई आमंत्रणे.
नकारात्मक बदल
वातावरणात इतरत्र,
बाष्पीभवनाची समस्या
तापमानात वाढ सर्वत्र.
परिणाम जीव जंतू वर
उपासमार शेतकऱ्यांची,
पाण्यासाठी फिरे मानव
न करे संरक्षण पर्यावरणाची.
