दुर्ग संवर्धन काळाची गरज
दुर्ग संवर्धन काळाची गरज
महाराष्ट्राचे वैभव आहे
गड आणि किल्ले!
राजे छत्रपती शिवरायांनी
आपल्या हाती सुपूर्द केले!!१
त्यांच्या सुवर्ण इतिहासाचे
ते मूक साक्षीदार आहेत!
महाराष्ट्राच्या इतिहासातील ती
सुवर्ण अक्षरी पाने आहेत!!२
ऐतिहासिक, भौगोलिकदृष्ट्या
महत्त्वाची भूमिका बजावतात!
पिकनिकचे निसर्गरम्य ठिकाण
म्हणायला का बरे धजावतात!!३
समृद्ध वारसा म्हणून खरंतर
करायला हवं त्यांचं संरक्षण!
प्रदूषण, कचरा नियंत्रित कराल
तरच होतील दुर्ग,किल्ले जतन!!४
शिवरायांसाठी ठरेल खरा तोच
कृतीयुक्त असा मानाचा मुजरा!
दूर्गक्षेत्री वनसंपदेची ठेवून नोंद
काढूयात परीसर पिंजून दुसरा!!५
सेल्फी,मनोरंजन,पिकनिक
येवढ्यासाठीच नको दुर्गदर्शन
ऐतिहासिक भौगोलिक महत्त्वाचे
दस्ताऐवज म्हणूनची दिग्दर्शन!!६
आजच्या काळात दूर्गक्षेत्री वनसंपदेची जाण ठेवून प्रदूषण नियंत्रण करणे आवश्यक आहे.
