दुरावा
दुरावा
पंख गळाले उडतांना
माहित पडले ना कुणा
आकाश, पाताळ धरनीत
विखूरल्यात खाणा खूणा...
दुराव्यात ही प्रेम पाहूनी
अलगद येवून उभी ठाकली
कोमल शांत भाव मनीचे
विधीलिखीत काव्यांजली....
चंद्र चांदणे ही सोबतीला
हा दुरावा ताल सुराचा
नित्य नवे गीत बनुनी
अवघड डोंगर चढायचा..
ह्रदयात दुराव्याची ज्योत
मिसळते त्यात मस्त तगमग
आत फुलांचा सुगंध भरतो
क्षणोक्षणी उजळते झगमग..
सकार भाष्य देती मजला
जीवन जगन्याच्या गतीमती
नकारले मी रंज गंज अन्
हास्याचे रंगीत मंच उजळती..