दुपार...
दुपार...
1 min
921
सरता सकाळ आली मग दुपार,
कोवळ्या किरणांनी घेतली माघार,
अंगातून निथळती घामाच्या धारा,
लाल काळी होई उन्हाने धरा,
तापता तन लोक येती घरा,
लागता उन्ह पक्षी घेई आसरा,
वाराही पडला उष्म्याने फुलला,
मोती ही त्रासून कोपऱ्यात बसला,
अंगणातला आंबा देई गार वारा,
झुळकीने त्याच्या बरे वाटे जरा,
पोटात जाता चटणी न भाकर,
झोपेची येई थोडीशी लहर,
हा हा म्हणता टळली उन्हे,
झाले सारे पुन्हा ताजे तवाने.
