दुनियेतली घुसमट"
दुनियेतली घुसमट"
1 min
83
दुनियेतली घुसमट कशी
साहेल का ती या जगी
भयमूक्त झाली पाहिजे
नारी ही आता तरी...
दु:खाविले कोणी कसे
पाण्यातल्या कमळासही
निष्पाप जीवाला सांत्वना
अन् द्या आधार कधी तरी...
रागावली माताजरी ठेवा
मनी ठेवा जागा तिची
प्रेमातल्या घरट्यात नांदा
आई संगे कधी तरी....
सौख्यातल्या प्रेमास कोणा
सोडवे गोडी कशी
आशा निराशा ही जीवनी
येणारच ना कधी तरी....
पाखरे उडालेत अंबरी,
जाणारही माळ्यातही,
दाही दिशा फिरणार तो
पण येणार घरी कधी तरी....
