STORYMIRROR

Ashok Kulkarni

Others

4  

Ashok Kulkarni

Others

दुनिया रंगमंच रे बाबा

दुनिया रंगमंच रे बाबा

1 min
364

दुनिया आहे रंग मंच रे बाबा

आपण सगळे आहोत "पात्र"।

जो तो आपली भूमिका वठवी

दोरी आहे त्याच्या हातात मात्र।।


जीवन म्हणजे आहे नाटक

सारे अभिनय करती या जगती।

ईश्वरानेच निर्मिली रचना

कोणी हसती कोणी रडती।।


कोणी करती प्रेम,कोणी द्वेष

कोणी असती खुश,कोणी दुःखी।

पावलागणिक असे खलनायक

नसे कोणी ह्या जगती सुखी।।


द्यावा लागेल हिशेब, एक दिवस

केलेल्या इथल्या अभिनयाचा।

बसला आहे वरती आपल्या

घ्यावया निर्णय केलेल्या कर्माचा।।


म्हणून म्हणतो बाबा, 

वठवी आपुलीभूमिका या रंगभूमी।

कर कसदार अभिनय

याद करेल दुनिया जन्मोजन्मी।।


Rate this content
Log in