दुःख
दुःख
1 min
50
कसं सांगु आई
मनातलं दुःख तुला
किंमत न राहिली
येथे जीवन जगण्याला
रोज होती अन्याय
बलात्कार हत्या
बेचिराख होतात
कितीक पेटल्या पंत्या
उजेडात पाप होते
अन्याय रात्रीत
जिथे पहावे तिथे
दलाल घसघशीत
भावना मनाला
कवळी किंमत
अब्रू लुटती पहा
कुत्र्याची हिम्मत
दिवसा दरोड्या
होती लूटमार
खूप अती होत
आहे भ्रष्टाचार
