दु:खी शब्द...
दु:खी शब्द...
हृदयाच्या खोल तळाशी असावा,
एखादा कप्पा असा...
जिथे दुःख कोंडुन ठेवता यावं...
किती गुदमरला श्वास तरी,
त्याला मात्र कधीच बाहेर येता न यावं....।।
कशाला हवेत अश्रुंचे पूर... ?
किती भिजविल्या वाटा.....।।
दु:खाला मी माझ्याच का दाखवू...?
उगचंच पर्याय खोटा.....।।
कितीही गेलो आड वळणांनी,
तरीही त्याची भेट ठरलेलीच प्रत्येक वळणावर...
का बाळगत बसू खोट्या आशा.....?
माहीत असूनही का शोधू...
रूक्ष वाळवंटात थंड पाण्याचे झरे...
सुखाशी जणू आहे आमचे सातजन्माचे वैर...
मग उगचंच का.....?
सुखाचा शोध घेत फिरू सैर -भैर...।।
नशिबात आमच्या फक्त उन्हाचे चटके,
अन् पावसाळी राती...
आयुष्याची झाली असताना माती...
सुखाची झोप तरी, कशी येईल या नेत्री...।।
चाचपडत राहीलो आम्ही...
काळयाकुटट् अंधारात,
शोधत काही क्षण सुखाचे... ।।
मिणमिणता प्रकाशही हवाहवासा वाटला होता तेव्हा....
वा-याची एक झुळुक येताच....
तोही साथ सोडून गेला...
किती निर्दयी असतो ना हा काळ?
कुणासाठी कधीच थांबत नाही...।।
दुभंगलेल्या मूर्तीचा सरते शेवटी,
उरतो फक्त एक मातीचा गोळा...
घडणार नसते त्यातुन नविन काहीच....
मातीचा गंध तर उडून गेलेला असतो कधीच ।।
वाट पहातो तो फक्त मातीत मिसळण्याची...
संपत आली आहे त्याचीही शेवटची यात्रा..
सुखाने जगता आले नाही....
परंतु सुखाने मरता तरी येईल,...
या एकाच आनंदाने तोही सुखावून गेला....
पुन्हा कधीच पुर्नजन्म नकोच...
हे एकच वचन घेऊन .... !
