दस्तक पावसाची
दस्तक पावसाची
1 min
197
काळे काळे ढग देतात दस्तक पावसाची
वाहणारे वादळवारे देतात दस्तक पावसाची
चमकणारे वीज देती चेतावणी पावसाची
गडगड करणारे ढग संदेश देती पावसाची
चातक पक्षी वाट पाहतो पहिल्या पावसाची
उन्हाने तप्त धरणी प्रतिक्षा करते पावसाची
शेतकरी वाट पाहतो पाऊस बरसण्याची
चिंब भिजण्यासाठी मुले वाट बघतात पावसाची
पावसाने निसर्ग देखील नवा आकार घेतो
ओल्या ओल्या मातीतून नवा अंकुर फुटतो
प्रत्येक सजीवांचे जीवन नव्याने बहरतो
त्यामुळे प्रतीक्षा असते पहिल्या पावसाची
स्वागत करतो सर्वजण त्याच्या आगमनाची
