दस्तक पावसाची.....
दस्तक पावसाची.....
1 min
169
दस्तक पावसाची
वादळाने करून दिली,
जनजीवन विस्कळीत
झाडे उन्मळून पडली...
दस्तक पावसाची
धडकी शेतकर्याला,
कसे थाेपवावे आता
वार्याच्या या मार्याला...
दस्तक पावसाची
विजेचा ताे खाेळंबा
घाेंघावले ते वादळ
अचानकच हा अचंबा...
दस्तक पावसाची
अनिश्चित वातावरण,
लक्ष नाही कामात
भरकटत जाते मन...
