दप्तराचे ओझे
दप्तराचे ओझे
1 min
292
दप्तराचे ओझे वाहते
आम्हा मुलांची पाठ
दप्तर घेवून चालताना
लागते आमची वाट
आमच्या दप्तरात असते
पुस्तक-वह्यांची खूप दाटी
स्वाध्याय पुस्तकासोबत
भलीमोठी असते पाटी
आता मात्र नाही चिंता
दप्तराचे ओझे झाले कमी
हलक्या फुलक्या दप्तरासोबत
हसत गाठतो शाळा आम्ही
शाळेत आमच्या आहे आता
दप्तर ठेवण्यासाठी कपाट
हवे तेवढे दप्तर सोबत
झाली हलकी आमची पाठी
शनिवार झाला आवडीचा
दप्तराविना भरते शाळा
कलाकुसर, खेळ गाण्यांमुळे
आम्हा लागला शाळेचा लळा
हव्या तेवढयाच पुस्तक वह्या
दप्तर आमचे हलकेफुलके
हसत खेळत शाळेला जातो
आम्ही सारी छोटी बालके
