STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

दोन हजार वीस...!

दोन हजार वीस...!

1 min
504

दोन हजार वीस....!


दो न दोन शब्द करीत

न कळत कित्येक शुभेच्छा मिळाल्या

ह सत हसत त्या

जा ण्याऱ्या वर्षास सलाम

र सरशीत हस्यासह करीत

वि नवणीने नवीन वर्ष

स हज घेऊन आल्या....!


त्या शुभेच्छांची ताकद इतकी मोठी

की नवीन वर्ष भारावून गेले

मैत्रीच्या ओझ्याने ते

आपोआप नम्रतेने वाकले...

आणि म्हणाले

माझ्या प्रिय शुभ चिंतकांनो

असाच स्नेह ऋणानुबंध

सदैव जीवनात राहू दे

सौख्य समाधान शांतीचे जीवन

तुम्हा सर्वांना माझ्यासह लाभू दे....!


नूतन वर्षाच्या शुभेच्छांसाठी आभार 

आणि मनःपूर्वक शुभेच्छा...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन