दोन बाळंतीण
दोन बाळंतीण
1 min
112
धोधो बरसत्या पावसात
पोटात माझ्या कळ आली
मला एक बाळ झाल
गोड बातमी आली
धोधो पडत्या पावसात
कुत्री बाळंतीण झाली
तिने पिल्लांना जन्म दिला
तिची तारांबळ उडाली
माझ्या एका बाळासाठी
आजी, आजोबा,बाबा,आई
ती बाळांना घेऊन फिरते
तिच्या बाळांना फक्त आई
मी खाते मेव्याचे लाडू
तिला भाकरीचा कोर ही नाही
ती बाळंतीण मी बाळंतीण
पण आमच्या काही मेळ नाही
सतत मेला पाऊस पडला
तिने एक एक जीव गमावला
मी बिचारी पाहत होती
की ती बिचारी सोसत होती
