दंग हा अभंग
दंग हा अभंग

1 min

11.8K
रूप तुझे पाहूनी होतो मी दंग|
रचला असा मी तुझसी अभंग||
शब्दरूपी परब्रह्म गोड अबोल|
पाटी असता समर्थ बनते संकटाची ढाल||
भक्ती माझी साधी भोळी सेवा ही निरंतर|
दिव्य रूप स्वामी तुझे निर्गुण निराकार||
मनी अंतरीचा ठेवा उजळला दिवा|
तुझे नाम घेता मना शांती लागे जीवा||
स्वामी चरणी माथा ठेवूनी आता|
दु:ख नष्ट होता, स्वामी आधार देता||