STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

दिव्यांग दिन.गीत.

दिव्यांग दिन.गीत.

1 min
27.4K


या दिव्यांग दिनाला

आपल्या दिव्यांग बांधवाना

त्यांच्या जागतिक सन्मानाला

देऊ दिलासा बांधवाना

भारत मातेच्या सुपुत्राना

आपल्या हिंद बांधवाना


आहे त्यांचा हो वाटा

देशकार्याला लई मोठा

लाऊ त्यांना व्यवसायावर

हे देशाचे आधार

कौशल्याचे देऊन शिक्षण

स्वावलंबी करू आपण


लोकजागृती जगभर करुन

संकल्प हाती धरून

करू पोटासाठी आधार

हातभार त्यांच्या न्याय हक्काला

उच्च शिक्षणाच्या कार्याला

नको भिकारीपण, लाचारीपण

काम मिळावे त्यांना गुणवत्तेतून


राखला जावा त्यांचा स्वाभिमान

जगात व्हावा त्यांचा सन्मान

विकास त्यांचा व्हावा खरोखर

घालू आत्मविश्वासाची भर

वाव मिळो त्यांच्या कलेला

जगाच्या स्पर्धेत टिकण्याला


साजरा करू दिव्यांग दिन

सर्व शाळा, कॉलेजातून

जगात उंचाऊ मान

लाऊ कष्टाला त्यांचे हात

सर्व खेड्या पाड्या, शहरात

सर्व मानव एकत्र करुन

समानतेची देऊ शिकवण

वाचवू सारे दिव्यांग जन.



Rate this content
Log in